साई बाबा आरती || Sai Baba Arti
आरती साईं बाबा, सौख्य दातार जीवा
चरण रजतळीं द्यावा दासा विसांवा, भक्ता विसांवा
आरती साईं बाबा
जाळूनिया अनंग सस्वरूपी राहे दंग
मुमुक्षुजना दावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग
आरती साईं बाबा
जयामनी जैसा भाव, तया तैसा अनुभव
दावीसी दयाधना ऐसी, तुझी ही माव
आरती साईं बाबा
तुमचे नाम ध्याता, हरे संसृती व्यथा
अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा
आरती साईं बाबा
कलियुगी अवतार सगुणब्रह्म साचार
अवतीर्ण झालासी, स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर
आरती साईं बाबा
आठा दिवसा गुरुवारी, भक्त करिती वारी
प्रभुपद पहावया, भवभय निवारी, भवभय निवारी
आरती साईं बाबा
माझा निजद्रव्य ठेवा, तव चरणरज सेवा
मागणे हेचि आता, तुम्हा देवाधी देवा, देवाधी देवा
आरती साईं बाबा
इच्छित दिन चातक, निर्मल तोय निज सुख
पाजावे माधवा या सांभाळ आपुली भाक, आपुली भाक
आरती साईं बाबा
आरती साईं बाबा, सौख्य दातार जीवा
चरण रजतळीं द्यावा दासा विसांवा, भक्ता विसांवा
आरती साईं बाबा
आरती साईं बाबा
आरती साईं बाबा
Download PDF :- (Sai Baba Arti)
Related:-
GAYATRI MANTRA : गायत्री मंत्र आधुनिक जीवन में आध्यात्मिक संदेश का स्रोत 2024