Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ओवलु चर्नी थेवुनिया माथा
(आरती)
जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था,
जय श्री स्वामी समर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।
छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी, राया अवतरलासी ।
जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी ।
भक्तवत्सल खरा तु एक होसी, राया एक होसी ।
म्हणुनी शरण आलो तव चरणासी ।
जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था,
जय श्री स्वामी समर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।
त्रैगुण– परब्रम्ह तुझा अवतार, तुझा अवतार।
त्याची काय वर्णु लिला पामर ।
शेशादिक क्षीणले नलगे त्या पार, नलगे त्या पार ।
तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार ।
जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था,
जय श्री स्वामी समर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।
देवाधिदेवा तु स्वामी राया, तु स्वामी राया।
निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया।
तुझसी अर्पण केली आपुली ही काया, आपुली ही काया ।
शरणागता तारी तु स्वामी राया।
जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था,
जय श्री स्वामी समर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।
अघटीत लिला करुनी जडमुढ उध्दारिले, जडमुढ उध्दारिले ।
किर्ती एकूनी कानी चरणी मी लोळे ।
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, मज हे अनुभवले ।
तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे ।
जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था,
जय श्री स्वामी समर्था ।
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।।
Also Read:-
Shree Jagannath : श्री जगन्नाथ आरती 2025
Shree Badrinath Ji : श्री बद्रीनाथजी की (आरती) 2024
Download PDF :- ( Shree Swami Samarth Aarti )

Related:-
Ambay tuh hai jagdambe : अम्बे तू है जगदम्बे (आरती) 2025
