Jai Hari Vitthal
येई हो विठ्ठले माझे माउली ये
(आरती)
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।
निढळावरी कर…..
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें
ठेवुनी वाट मी पाहें ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप
पंढरपुरी आहे…..
पंढरपुरी आहे माझा मायबाप
हो माझा मायबाप । १।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला
गरुडावरी बैसोनि …..
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला
हो माझा कैवारी आला । २ ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा…
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी
हो जीवे भावें ओवाळी । ३।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां
कृपादृष्टी पाहें…
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरी राया
हो माझ्या पंढरी राया । ४।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।।
Also Read:-
Shree Jagannath : श्री जगन्नाथ आरती 2025
Om Jai Gange Mata : ॐ जय गंगे माता (आरती) 2025
Download PDF :- ( vitthal Aarti )
Related:-
Raghuveer shree Ramchandra : रघुवर श्री रामचन्द्र (आरती) 2025
Raghuveer shree Ramchandra : रघुवर श्री रामचन्द्र (आरती) 2025